Pune News : डान्स क्लासेस व थिएटर उघडण्यासाठी ‘बालगंधर्व’ समोर आंदोलन

एमपीसी न्यूज – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन झाल्यापासून कलाक्षेत्रातील कलाकारांचं मोठं नुकसान झाल आहे. कलाकारांचं काम थांबल्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि. 8 सप्टेंबर) पुण्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर येथे नृत्य परिषद महाराष्ट्र संस्थेतर्फे पुण्यातील डान्स क्लासेस आणि थिएटर उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या माध्यमातून नृत्य कलाकार आणि लोककलावंतांनी आपल्या व्यथा मांडल्या तसेच मागण्या केल्या. याप्रसंगी परिषदेच्या सर्व सभासदांनी भारतीय नृत्याच्या पारंपरिक वेशभूषा करून कलाकारांच्या प्रातिनिधिक परिस्थितीचे प्रदर्शन घडवले.

घराच्या कर्जाचे हफ्ते, क्लासेसचे भाडे थकले आहे. कार्यक्रम नसल्याने हातात पैसे नाहीत. त्यामुळे नृत्य क्लासेस आणि थिएटर उघडण्यासाठी परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली.

याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, जतीन पांडे, रत्नाकर शेळके, आशुतोष राठोड, मुकेश गायकवाड, राहुल साठे, गिरीजा पाटील, दीपक रणदिवे, बालाजी गौड्गरी, राजू परदेशी, विकास कुच्चेकर, राहुल कोसन्दर, आर्य भोसले आदी कलाकारांनी हे आंदोलन यशस्वी करण्यात विशेष मेहनत घेतली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.