Pune News : ‘अभय योजने’मुळे पालिकेला मिळाले 27 दिवसांत 100 कोटी 54 लाख !

एमपीसी न्यूज : महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी विविध मार्गांचा अवलंब केला जात आहे. मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजना जाहीर केली. महापालिकेच्या या योजनेअंतर्गत 50 लाख रुपयापर्यंतच्या मिळकतकर थकबाकीदारांसाठी एकूण दंडाच्या रकमेत 80 टक्के सूट जाहीर करण्यात आली. त्यामुळे करवसुली वाढली आणि योजनेच्या पहिल्या 27 दिवसात महापालिकेच्या तिजोरीत 100 कोटी 54 लाख रुपये जमा झाले आहेत.

पुणे महापालिकेकडून 2 ऑक्टोबर पासून ही योजना राबविली जात आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल. योजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळाला.

27 दिवसात 42 हजार 100 करदात्यांकडून 100 कोटी 54 लाख रुपये महापालिकेकडे जमा झाले आणि पालिकेवरील आर्थिक ताण काही प्रमाणात हलका झाला.

चालू आर्थिक वर्षात मिळकतकराद्वारे 950 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.