Pune News : बनावट पासपोर्टसह बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज-पुण्यात बेकायदा वास्तव्य ( Pune News ) करणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला विशेष शाखेने (स्पेशल सेल) पकडले. तरुणाकडून बनावट भारतीय पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

महम्मद अमान अन्सारी (वय 22 ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अन्सारीविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 कलम 14 आणि पासपोर्ट कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष शाखेतील परकीय नागरिक पडताळणी विभागातील पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Rain : पुण्यात पुढील काही तासात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; यलो अलर्ट जारी

 

 

अन्सारी पाकिस्तानी नागरिक असून तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला भवानी पेठेतील चुडामण तालीम चौक परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट आढळून आले. अन्सारीने बनावट कागपत्रांद्वारे भारतीय पासपोर्ट मिळवले आहे. अन्सारीने बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली.

 

त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. अन्सारीचा बेकायदा वास्तव्य करण्यामागचा (Pune News) हेतू काय होता, तसेच तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. खडक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश तटकरे तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.