Pune News : नवीन आदेशानुसार दुकाने उघडायला परवानगी द्यावी : पुणे व्यापारी महासंघ

एमपीसी न्यूज – व्यापारी महासंघाने शासनाच्या नवीन आदेशानुसार दुकाने उघडायला परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबरोबरच शहरातील सर्व व्यापाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण केले जावे, अशी मागणी देखील पुणे जिल्हा रीटेलर्स असोसिएशनच्या वतीने पालिका आयुक्त विक्रम कुमार आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडे सोमवारी केली.

शासनाच्या नवीन नियमावलीत नमूद केल्यानुसार 10 टक्क्यांपेक्षा पॉझिटीव्हीटी रेट कमी असणाऱ्या जिल्ह्यांना दिलासा देण्यात येणार आहे. इथली दुकाने दुपारी 2 पर्यंत सुरु ठेवायला आता परवानगी देण्यात येणार आहे.

बाधितांचे सरासरी प्रमाण 10 टक्के पेक्षा कमी असून रुग्णालयामध्ये 76 टक्के ऑक्सिजनच्या खाटा रिकाम्या आहेत. त्यानुसार निर्भेद शिथिल करून दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी पुणे व्यापारी महासंघातर्फे करण्यात आली.

यावर आयुक्तांनी मागील दोन महिन्याच्या काळात व्यापाऱ्यांनी चांगले सहकार्य केले असून यापुढेही व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे, नवीन आदेश काढताना सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.