Pune News : पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांचा संप मागे; बससेवा पूर्वपदावर

एमपीसी न्यूज – पीएमपीएमएलच्या खासगी बस ठेकेदारांनी शुक्रवारी (दि. 22) सकाळच्या सत्रात प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न देता संप पुकारला होता. पूर्वकल्पना न देता संप पुकारल्याने संबंधितांवर ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे.

 

या संपामध्ये मे. ओलेक्ट्रा ग्रीनटेक, मे.ट्रॅव्हलटाईम कार रेटल प्रा.लि. मे. अॅन्टोनी गॅरेजेस प्रा. लि. मे. हंसा वहन इंडिया प्रा.लि. मे. एमपी इन्टरप्रायजेस अॅन्ड असोसिएटस लि, मे. इव्ही ट्रान्स प्रा.लि या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. ठेकेदारांनी कोणतीही पूर्वसूचना न देता हा संप पुकारला असल्याने ठेकेदारांवर अत्यावश्यक सेवा कायद्यान्वये (मेस्मा) कारवाई करण्याची नोटीस पीएमपीएमएल प्रशासनाकडून देण्यात आली.

 

अचानक पीएमपीएमएल बससेवा बंद झाल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. पीएमपीएमएल बसवर अवलंबून असणाऱ्या अनेकांना कार्यालयात, कामावर जाण्यासाठी उशीर झाला. अनेकांची कामे खोळंबली. शुक्रवारी दुपारी प्रशासन व ठेकेदार यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्यात आला आहे. आता पीएमपीएमएल बस सेवा पूर्वपदावर आली असल्याचे पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.