Pune News : पोट निवडणुकीमुळे उद्यापासून काही काळ पोलीस शिपाई चालक भरती प्रक्रीया राहणार बंद

एमपीसी न्यूज –  पुणे येथील कसबा पोट निवडणूक येवू ( Pune News) घातल्याने पुणे पोलिसांची जी शिपाई  चालक भरती प्रक्रीया आहे. ती उद्या म्हणजे 18 ते 27 फेब्रुवारी या नऊ दिवसांच्या कालावधीत बंद राहणार आहे.

पुणे पोलिसांची पोलीस शिपाईचालक भरती 2021 ही प्रक्रीया 3 जानेवारी ते 19 जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी पार पडली. त्यातील 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या 870 जणांची पुढील चाचणीसाठी निवड केली आहे. या निवड झालेल्या उमेदवारांची यादी www.punepolice.gov.in या संकेतस्थळावर  जाहीर केली आहे.

Chinchwad News : शंभूचरित्रातून कर्तव्यनिष्ठा शिकावी – अर्चना भोर – कारंडे

तसेच शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातही नोटीस बोर्डवर ही यादी लावली आहे. यासंबंधी काही तक्रारी असतील तर उमेदवारांना त्या 19 फेब्रुवारी पर्यंत सायंकाळी सहा वाजेपर्यंत [email protected] या ईमेल आयडीवर पाठवाव्यात असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे.

तसेच पोट निवडणूकीमुळे पुढील टप्पा 27 फेब्रुवारी नंतर ( Pune News) म्हणजे निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे, असेही पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.