Talegaon Dabhade : हिंद विजय सहकार पुरस्काराने दोन पतसंस्थांचा गौरव

एमपीसी न्यूज – धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था व भरत अग्रवाल नागरी सहकारी या दोन पतसंस्थांना हिंद विजय सहकार पुरस्कार देऊन (Talegaon Dabhade) गौरविण्यात आले. परिसरातील सर्व पतसंस्थांचे अहवाल मागवून त्याचा अभ्यास करत स्वच्छ कारभार व कमी ‘एनपीए’ असणाऱ्या पतसंस्थांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षी संस्थेने सर्व पतसंस्थेचे अहवाल मागवून व त्याचा सर्वे करून हिंद विजय सहकार पुरस्कार धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था व भरत अग्रवाल नागरी सहकारी पतसंस्थेस देऊन गौरव करण्यात आला.

Pune News : पोट निवडणुकीमुळे उद्यापासून काही काळ पोलीस शिपाई चालक भरती प्रक्रीया राहणार बंद

हा गौरव पतसंस्थेच्या स्वच्छ कारभार व कमी ‘एनपीए’ साठी देण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी   राजगुरुनगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष  दत्तात्रय भेगडे व प्रमुख पाहुणे म्हणून   जय हिंद को ऑप सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष गुलाबराव वाघोले  व ॲड रवींद्र दाभाडे, सुधाकर देशमुख  होते. यावेळी डॉ प्रमोद बोराडे यांनी अपरिचित मावळ या विषयावर सुंदर असे व्याख्यान दिले.

याप्रसंगी लता भरत अग्रवाल, सुनंदा दत्तात्रय दाबणे, संजय गायकवाड, राजू दळवी, रामविलास खंडेलवाल, मिलिंद खळतकर, यशवंत पायगुडे, अरविंद कुलकर्णी, सुरेश गायकवाड, ऋषिकेश लेंडघर,धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक खंडूजी टकले, विजय शेटे विनोद टकले संतोष परदेशी ॲड तुकाराम काटे, संजय शिंदे,अमर खळदे, मयूर वाघोले, मयूर पिंगळे, आदित्य टकले आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक कैलास भेगडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदीप गटे (Talegaon Dabhade) यांनी केले यावेळी पुरस्कार दिल्याबद्दल विजय शेटे यांनी हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.