Pune News : प्रवीण दरेकर यांच्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

एमपीसी न्यूज – क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे (रविवारी, दि.3) भेट देऊन सावित्रीबाई यांच्या स्मृतींना वंदन केले.

‘क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांना त्यांच्या प्रत्येक कार्यात सावित्रीबाईंची समर्थ साथ लाभली. आज स्त्री शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर आहे. स्रियांनीही अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. यासाठी आपल्याला क्रांतीज्योती थोर शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल’, या शब्दात दरेकर यांनी आदरांजली अर्पण केली.

यावेळी माजी आमदार व भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष योगेश टिळेकर, भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश घोष, विशाल पवार, योगेश पिंगळे, गणेश कलंबकर, संतोष रायकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.