Pune Crime News : पुणे पोलिसांची शहरात दणकेबाज गुटखा कारवाई

एमपीसी न्यूज – पुणे पोलिसांनी शहरात पुन्हा एकदा दणकेबाज गुटखा कारवाई केली आहे. एकाचवेळी वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून आज पहाटे छापेमारी केली आहे. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अनेक ठिकाणच्या छापे कारवाईत लाखोंचा माल सापडला आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काही महिन्यांपूर्वी गुटखा कारवाई करत राज्यात खळबळ उडवून दिली होती. पण, यानंतर पुन्हा शहरात गेल्या काही दिवसांपासून गुटखा विक्री सुरू आहे. ही माहिती मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी आज पहाटेच कारवाईला सुरवात केली.

एकाचवेळी पोलिसांनी २५ ते २६ ठिकाणी कारवाई केली आहे. त्यात गोडाऊनवर छापे टाकत दलालांना पकडले आहे. शहरात पहाटेपासून सुरू असलेल्या गुटखा कारवाईने पुन्हा शहरात खळबळ उडाली आहे. पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.