Pune News : ‘डॉ. इनामदार आय टी एज्युकेटर अवॉर्ड’ सहा आयसीटी शिक्षकांना जाहीर 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिजुअल ग्राफिक्स, डिझाईन अँड आर्टस् (वेदा) च्या वतीने आयोजित ऑनलाईन आय टी ऑलिम्पियाडचे  मंगळवारी  पारितोषिक वितरण होणार आहे.

या कार्यक्रमात आयसीटी विषयाच्या सहा शिक्षकांना  ‘डॉ. इनामदार आय टी एज्युकेटर अवॉर्ड’ देऊन गौरविण्यात येणार आहे. ऑनलाईन आय टी ऑलिम्पियाडच्या विजेत्यांनाही या समारंभात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम दहा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे.

उमेश खोसे, मृणाल गंजाले, नागनाथ विभूते, प्रकाश चव्हाण, शफी शेख, आनंद अनेमवाड  या शिक्षकांना  ‘डॉ. इनामदार आय टी एज्युकेटर अवॉर्ड’ देण्यात येणार आहे. डॉ. पी. ए. इनामदार, इरफान शेख, डॉ. ऋषी आचार्य, अंजुम काजळेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या ऑलिम्पियाडचे दहावे वर्ष होते. यावर्षी पाच राज्यातील  तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.