Chakan Crime News : प्रतिबंधित गुटख्याचा साठा व विक्री प्रकरणी दोघांना अटक, जवळपास सात लाखांचा मुद्देमाल जप्त  

एमपीसी न्यूज – प्रतिबंधित गुटख्याचा साठा व विक्री प्ररकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून जवळपास सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वासुली, ता. खेड या ठिकाणी महालक्ष्मी किराणा दुकानावर सामाजिक सुरक्षा विभागाने शुक्रवारी (दि.06) ही कारवाई करण्यात आली.

रामाराम कर्माराम चौधरी (वय 25, रा. खालुंब्रे, खेड) व रानाराम चंदाराम देवासी (वय 38, रा. वासुली, ता. खेड ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच, ओम बिष्णोई (वय 45, रा. रा. खालुंब्रे, खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगमताने किराणा मालाच्या दुकानात व चारचाकी (एमएच 14, जेआर 1858) गाडीत प्रतिबंधित गुटख्याचा साठा केल्याचे आढळून आले. सामाजिक सुरक्षा पथकाने याठिकाणी छापा टाकून आरोपींना ताब्याच घेऊन जवळपास सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.