Pune News : ममता फाउंडेशनमधील भगिनींबरोबर राखीपौर्णिमा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कात्रज येथील ममता फाउंडेशनमधील एचआयव्ही बाधित अनाथ निराधार मुलींनी राखीपौर्णिमेचा सण साजरा केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या उपक्रमात संस्थेतील मुलींनी स्वतः बनविलेल्या राख्या बांधल्या.

गिरीश गुरनानी म्हणाले, ‘राखी पौर्णिमेनिमित्त ममता फाउंडेशन संस्थेला भेट दिली. एड्सग्रस्त मुलींसाठी कार्य करण्यात आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात अग्रेसर अशी ही संस्था आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या भगिनींना बघून मन भरून आले. त्यांच्याकडून राखी बांधून घेत असताना त्यांच्या डोळ्यातल्या आशा, आकांक्षा किती मोठ्या आहेत आणि स्वतंत्र जगण्याची उमेद किती जागृत आहे याची अनुभूती झाली.’

या उपक्रमात अमोल गायकवाड, प्रीतम पायगुडे, संदेश कोतकर, रवी गाडे, सौरभ ससाणे, आकाश नागरे सहभागी झाले होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.