Pune News : आगामी महापालिका निवडणुकीत 50 ते 60 नगरसेवकांचे टार्गेट : मनसे

एमपीसी न्यूज – वेळ कमी आहे, मात्र संघटन क्षेत्राच्या जोरावर आगामी निवडणुकीत 50 ते 60 नगरसेवक निवडून आणणार असल्याचे पुणे शहर मनसे अध्यक्ष वसंतराव मोरे यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मनसेचे राज्य नेते बाबू वागस्कर उपस्थित होते. मनसे अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी जाहीर केल्याचे यावेळी सांगण्यात आले. लवकरच महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार ही कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. फील्डवर्क काम करणार आहेत, सभागृहात ज्या प्रभागात आंदोलन सुरू असेल त्या प्रभागात विषय मांडण्याचा प्रयत्न करू. होय मी नगरसेवक होणारच, अद्ययावत कार्यलये, सोशल मीडियाचा वापर या निवडकीसाठी करण्यात येणार आहे. पुण्यात अनेक प्रकल्प प्रलंबित असून त्यांना उजाळा देण्यात येणार आहे. संपूर्ण पुणे शहरात मनसे कडवे आव्हान उभे करणार आहेत. 15 प्रभाग समिती अध्यक्ष तातडीने नेमण्यात येणार आहे. सभागृहातील मनसे आता एकाचवेळी रस्त्यावरही उतरणार असल्याचे बाबू वागस्कर यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.