Pune News : वडगाव, कात्रज आणि धनकवडीचा पाणी पुरवठा गुरूवारी राहणार बंद !

एमपीसी न्यूज : वडगाव जलकेंद्र येथील विद्युत पंपिंग विषयक दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे वडगाव, कात्रज, धनवकडी व परिसरात गुरूवारी (दि.25 फेब्रुवारी) रोजी दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनि:सारण विभागाकडून कळविण्यात आले आहे.

तसेच शुक्रवारी (दि.26 फेब्रुवारा) रोजी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक व परिसर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.