Pune News : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर वारंवार बलात्कार

एमपीसी न्यूज : विवाहाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार बलात्कार करण्यात (Pune News) आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात 32 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून श्रीमंत अंबादास लोखंडे (वय 29) याच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

2013 ते 2019 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पिडीत तरुणीची व श्रीमंत याच्याशी ओळख झाली होती. ओळखीनंतर त्याने पिडीत तरुणीला विवाह करण्याचे आमिष दाखविले व तिचा विश्वास संपादन केला.

त्यानंतर तिच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी लैंगिक अत्याचार केला. परंतु, विवाह केला नाही. विवाह (Pune News) करण्याबाबत तरुणीने श्रीमंत याच्याकडे विचारणा केली असता त्याने तरुणीला शिवीगाळ करून मारहाण देखील केली.

विवाह न करता फसवणूक केल्याने तरुणीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Pune : पुण्यातील महिलांना फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.