Maharashtra Budget Session 2023 LIVE : दुसऱ्या दिवशी कांद्यावर विरोधक आक्रमक; भिडे वाड्याचा प्रश्नावरही चर्चा

एमपीसी न्यूज : राज्यातील अर्थसंकल्पीय (Maharashtra Budget Session 2023 LIVE) अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली आहे. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कांद्याच्या मुद्द्यावर घेरले असून सुरुवातीलाच कांद्यावरून गदारोळ माजला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याची खरेदी नाफेडने सुरू केल्याचे म्हंटले आहे.


सकाळी 11.15 वाजता : भिडे वाड्याचा पुनर्विकास 

मंत्री छगन भुजबळ यांनी भिडे वाड्याच्या पुनर्विकासाचा प्रश्न मांडला असून त्यावर 10 मार्चच्या आत भिडे वाड्यासाठी पेमेंट झाले पाहिजे आणि तो प्रश्न पूर्ण करण्याचे आदेश मी दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले.


सकाळी 11 वाजता : कांद्यावर विरोधक आक्रमक 

विधानसभेत मंत्री छगन भुजबळ यांनी कांद्याचा मुद्दा मांडला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांद्याची निर्यात थांबवली नसून निफाडने त्याची खरेदी सुरू केल्याचे म्हंटले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सर्व मदत सरकार करेल असे आश्वासन दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.