Pune : पुण्यातील महिलांना फोन करून अश्लील संभाषण करणाऱ्या दोघांना दिल्लीतून अटक

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील उच्चभ्रू परिसरात राहणाऱ्या महिलांचे (Pune) मोबाईल क्रमांक मिळवून त्यावर फोन करत अश्लील संभाषण करणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी दिल्लीतून बेड्या ठोकल्या आहेत. अटक केलेल्या मध्ये एका महिलेचा समावेश आहे. चेतन मासी दासी (वय 32, रा. वीरेंद्रनगर, दिल्ली), त्याची साथीदार कविता अनिल शर्मा (वय 22, रा. उत्तमनगर, दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शहरातील उच्चभ्रु भागातील महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून चेतन दासी अश्लील संवाद साधत होता. या महिलांना तो वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवित होता. शिवाजीनगर पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक तपासात आरोपी चेतन आणि त्याची साथीदार कविता दिल्लीत वास्तव्यास असल्याचे समोर आले.

यानंतर पोलीस उपनिरीक्षक मनीषा जाधव, रुपेश वाघमारे, आदेश चलवादी व त्यांचे पथक दिल्लीत गेले. पोलिसांनी दिल्लीतील 250 ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. त्यावेळी आरोपी गाझियाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. माहितीची खातरजमा मिळाल्यानंतर चेतन आणि कविता यांना पकडण्यात आले. दोघांना (Pune) घेऊन पोलिसांचे पथक शहरात दाखल झाले. आरोपींकडून नऊ मोबाइल संच आणि सीमकार्ड जप्त करण्यात आले.

Pune Crime : बस प्रवासात झालेली ओळख पडली महागात; आधी बलात्कार नंतर उकळले 16 लाख

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.