Pune News : आमदार शिरोळेंकडून रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिम कामाचा आढावा

एमपीसी न्यूज : पुण्याचे माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीमधून तीन चाकी व हलक्या वाहनांची योग्यता तपासणी करिता रोलर ब्रेक टेस्टिंग सिस्टिमसाठी 2018 साली पन्नास लाख रुपय निधी मंजूर करण्यात आला होता. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज, गुरुवारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाला भेट दिली आणि या कामाचा आढावा घेतला.

सध्या रोलर ब्रेक टेस्टिंगसाठी रिक्षा चालक आणि अन्य वाहनांना दिवे घाट येथे जावे लागते. परंतु, टेस्टिंग जर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाले तर छोट्या वाहनधारकांचा वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे.

या कामासाठीच्या तांत्रिक प्रक्रियेची आमदार शिरोळे यांनी माहिती घेतली. आगामी पाच ते सहा आठवड्यात तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले.

याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरटीओचे अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.