Pune News : कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा देणाऱ्या तीन प्रयोगशाळांना करणे दाखवा नोटीस

पुणे महापालिकेची धडक कारवाई

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा देणाऱ्या पुण्यातील तीन खाजगी प्रयोगशाळांना सोमवारी महापालिकेतर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.

पुणे शहरात कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. महापालिकेतर्फे त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोरोना नियंत्रणाचा भाग म्हणून चाचण्यांचे अद्ययावत अहवाल महाराष्ट्र शासन व इतर विविध शासकीय यंत्रणांना पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी वेळेत पाठविणे आवश्यक असते.

लॅबोरेटरी सर्व्हिसेस बायोसायन्सेस प्रा. लि., क्रस्ना डायगणोस्टीकस प्रा. लि, आणि ए. जी. डायगणोस्टिक्स प्रा. लि. पुणे या तिन्ही प्रायव्हेट लॅबकडून कोरोना चाचणी अहवाल मागविण्यात येत असे.

परंतु, या तिन्ही लॅबकडून दैनंदिन कोरोना चाचणीचा अहवाल उशिरा प्राप्त होतो. त्यामुळे माहिती वेळेत सादर होत नाही. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यास अडथळा निर्माण होत आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल प्रत्यक्ष दिवशी सादर होत नसल्याने या तिन्ही लॅबला पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत तसेच साथरोग प्रतिबंध कायदा 1897 अंतर्गत प्रयोगशाळा बंद करणे आणि लॅबची नोंदणी रद्द करण्याच्या कारवाई बाबत ही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.