Pune News: पुण्याला वेगळा न्याय का; महापौर मोहोळ यांचा सवाल

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने मुंबईकरांना निर्बंधातून सूट दिली, मात्र, पुण्यावरील निर्बंध कायम ठेवले. यावरुन पुण्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मुंबईला एक आणि पुण्याला दुसरा नियम का, असा सवाल महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.

राज्य सरकारने सोमवारी रात्री उशिरा निर्णय घेऊन मुंबई महापालिका हद्दीतील दुकाने आणि हॉटेल्सवरील निर्बंध शिथिल केले. पुण्यात रुग्णांचे प्रमाण घटत असताना दोन शहरांना वेगवेगळे नियम का, असा प्रश्न पुणेकरांच्या मनातही निर्माण झाला आहे. पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी असूनही निर्बंध का ठेवले, असा सवाल पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारला विचारला आहे.

भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही सरकारच्या निर्णयाबद्दल तीव्र स्वरुपात नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने निर्बंधांचा फेरविचार करावा, अशी मागणी पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी केली आहे.

शहरातील दुकानांना व्यवसायासाठी वेळेची मुदत वाढवून द्यावी याकरिता पुणे व्यापारी महासंघ आज (मंगळवारी) शहरात 21 ठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहे आणि बुधवारी चार वाजल्यानंतरही दुकाने चालू ठेवणार आहे. या आंदोलनाला महापौर मोहोळ यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.