Pimpri: कुप्रसिध्द गुन्हेगार वैभव हातांगळे येरवडा कारागृहात स्थानबद्ध

एमपीसी न्यूज – पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार वैभव हातांगळे (Pimpri)याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत.
वैभव चोखोबा हातांगळे (वय 24, रा. बनसाळ गल्ली, गांधीनगर, पिंपरी) असे कारवाई(Pimpri) झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दित गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा अभिलेख तपासून त्यांच्यावर मोका व एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चाबे यांनी दिले आहेत.

पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दित कोयता सारख्या हत्यारांसह गंभीर दुखापत करणे, दुखापत करणे, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे व बेकायदेशीररित्या विनापरवाना घातक शस्त्रे जवळ बाळगणे यासारखे सात गुन्हे वैभव हातांगळे याच्यावर दाखल आहेत. त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. त्याला येरवडा कारागृहात 15 मार्च रोजी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कामगिरी पिंपरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 1) बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पीसीबी गुन्हे शाखा) अनिल देवडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) रूपाली बोबडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, ओंकार बंड, यांनी केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.