Pune : आता बस झालं, तुला नक्की पाडणार, मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी; पुणे भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

एपीसी न्यूज – पुण्यात ‘स्टँडिंग दिली, महापौर केलं, सरचिटणीस पण दिलं… आता खासदारकी पण देणार? (Pune) आता बास झालं… तुला नक्की पाडणार! – कष्टाळू भाजप कार्यकर्ते’ अशा आशयाचा फ्लेक्स लावून मुरलीधर मोहोळ यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे पुणे भाजपामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. यावर मोहोळ यांनी बोलण्यास नकार दिला.

पुणे लोकसभा जसजशी जवळ येत आहे. तसे तसे पुण्यात वातावरण गरम व्हायला लागले आहे. यापूर्वी काँग्रेसचे जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांनी थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठविले आहे. जाहीर सभा घेऊनच उमेदवार जाहीर करण्याची मागणी बागुल यांनी पत्राद्वारे केली आहे. त्यामुळे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Pune : महिलांनी आपले मूल्य ओळखले पाहिजे; गीतांजली किर्लोस्कर याचे मत

भाजपतर्फे राज्यसभेचे माजी खासदार संजय नाना काकडे, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक सुनील देवधर प्रमुख इच्छुक आहेत. मात्र, यामध्ये सर्वाधिक आघाडीवर मोहोळ यांचे नाव आहे. त्यांच्या नावाला आता पक्षातूनच (Pune) विरोध होत असल्याने मोहोळ यांना हा धक्का मानला जात आहे. पुणे शहर हे पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांत निवडणुकीच्या काळात अनेक वेळा फ्लेक्सबाजीमधून नेत्यांना सुनावल्याचे पाहण्यास मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.