Pune : आर्किटेक्चरल डिझाईन स्पर्धेतील राष्ट्रीय विजेत्यांशी 23 जून रोजी चर्चासत्राचे आयोजन

एमपीसी न्यूज – ‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज’ या (Pune)  संस्थेतर्फे ‘आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशन्स -पुशिंग द एज इन आर्किटेक्चर प्रोफेशन’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण हे या चर्चासत्राला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

सुनील पाटील (संचालक सुनील पाटील अँड असोसिएट्स), कल्पक भंडारी( संचालक, विकास स्टुडिओ), विजय साने (पार्टनर, व्ही.के.: यु ,अर्बन) हे मान्यवर या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. हे तिन्ही मान्यवर वक्ते हे राष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या आर्किटेक्चरल डिझाईन कॉम्पिटिशनमधील विजेते असून ते त्यांचे अनुभव आणि विचार या चर्चासत्रात मांडणार आहेत.

23 जून रोजी सायंकाळी 5 ते 7 या दरम्यान सेनापती बापट रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुमंत मुळगावकर सभागृह येथे हे चर्चासत्र होईल.

आर्किटेक्चरचे विद्यार्थी, आर्किटेक्ट व्यावसायिक तसेच या क्षेत्राशी संबंधित व्यक्ती या चर्चासत्रात सहभागी होणार आहेत. विनामूल्य नाव नोंदणीसाठी गुगल फॉर्म भरण्याचे आवाहन करण्यात (Pune) आले आहे. ‘सस्टेनॅबिलिटी इनिशिएटिव्हज’ ही संस्था आर्किटेक्चर क्षेत्रातील व्ही.के. ग्रुप या कंपनीचा एक उपक्रम आहे.

व्ही.के. ग्रुपच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोल्डन डायलॉग ही चर्चासत्रांची मालिका आखण्यात आली असून हे चर्चासत्र या मालिकेतील तिसरे चर्चासत्र आहे.

पुणेकरांना भेडसावणाऱ्या शहरी समस्या, पर्यावरणविषयक जागरूकता, शाश्वत शहर विकास, शहरी जीवनाची गुणवत्ता अशा गोष्टींवर ऊहापोह करण्यासाठी या क्षेत्रातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ, सरकारी अधिकारी, स्थापत्यशास्त्राचे विद्यार्थी, नागरिक,  इंजिनिअर्स, वास्तुविशारद, स्टेकहोल्डर्स यांना ‘गोल्डन डॉयलॉग्ज’ या संवादमालेत आमंत्रित करण्यात येते.

या संवाद मालिकेची वर्षभरात पाच सत्रे नियोजित करण्यात आली आहेत. ज्यामध्ये ‘रोल ऑफ प्लेसमेकिंग इन अर्बन रिव्हायटलायजेशन, पुणे शहरासाठी हवामान कृती आराखडा, डिझाइन स्पर्धेची भूमिका, शहरी इमारतीमध्ये रेटिंग सिस्टीमचे महत्त्व, पर्यावरणीय लँडस्केपिंग आणि शाश्वत शहरीकरण यासारख्या शहर विकासाशी निगडित विविध विषयांवर तज्ञांसोबत चर्चा केली जाईल.

आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी 1973 साली सुरु केलेली ही आर्किटेक्चर प्रॅक्टिस आता जवळपास 250 जणांचे कुटुंब बनली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या पुणे शहराचा प्रवास विश्वास कुलकर्णी यांनी अगदी जवळून पाहिलेला आहे. व्यवसाय कायमच चोख आणि प्रामाणिकपणे करण्याबरोबर त्यांनी समाजोपयोगी काम करण्यावर भर दिलेला आहे. पुण्यातील या सर्वात जुन्या आणि मोठ्या कंपनीचा पुणे शहराच्या विकासात मोलाचं वाटा आहे.

फक्त आर्किटेक्चर प्रॅक्टिस पासून सुरु झालेली ही फर्म आज शहर नियोजन, पर्यावरण, ग्रीन बिल्डींग्स, इंटेरिअर डिझाइन अशा विविध क्षेत्रात अग्रेसर आहे. पुणे शहरातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर,जिल्हा परिषदेची नवी प्रशासकीय इमारत,परमार ट्रेड सेंटर अशा 1 हजाराहून अधिक इमारतीचे आरेखन या कंपनीने केले आहे. ग्रीन होम्स प्लॅटिनम प्रमाणन व्ही के ग्रुप कडून केले जाते.विश्वास कुलकर्णी यांना त्यांच्या योगदानाबद्दल ग्लोबल रिअल इस्टेट काँग्रेसने ‘टॉपमोस्ट आर्किटेक्चर लीडर्स’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Pune News : राष्ट्रीय शिक्षण धोरणावर संस्था चालकांसाठी गुरुवारी चर्चासत्राचे आयोजन

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.