Pune : पर्यावरण दिनी पुण्यात ‘तेर एन्व्हायरॉथॉन’चे आयोजन

एमपीसी न्यूज : जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य (Pune) साधून ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरण संवर्धन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पुणे स्थित संस्थेने ‘एन्व्हायरॉथॉन – रन फॉर एन्व्हायर्नमेंट’ हा उपक्रम आयोजित केला असून 500 हुन अधिक पर्यावरण दूत, नागरिक सहभागी होणार आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस हॉकी ग्राउंड पाषाणवरून 4 जून रोजी रविवारी पहाटे 5 वाजता सुरु होईल. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा संचालक महादेव कसगावडे, पुणे ग्रामीण पोलीस सहायक अधीक्षक मितेश घट्टे, आयर्न मॅन हेमंत परमार व थिस ग्रिड्झ हे खास जर्मनीहून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. ही फक्त स्पर्धा नसून पर्यावरण जागृतीसाठीचा जागर आहे. या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.

MPC News Special : पोलीस ठाण्यातील अडगळ होणार दूर; वाहनांची लागणार विल्हेवाट

यावर्षी पुणे, दौंड, मुंबईसह कर्नाटक, आसाम, दिल्ली, हरियाणा येथून अनेक पर्यावरणप्रेमी स्पर्धक सहभागी होणार आहेत . स्पर्धा 12 ते 18, 19 ते 40, 41 ते 55 व 56 पेक्षा जास्त अशा गटामधून घेण्यात येणार आहे. तीन, पाच आणि दहा किलोमीटरसाठी ही स्पर्धा होणार आहे. दहा किमीसाठी रोख पारितोषिक व पाच व तीन किमीसाठी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत. नाव, नोंदणी 31 मेपर्यंत करता येईल. अनेक कंपन्यांचे मोठे गट (Pune) सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत जितके लोक सहभागी होतील तितकी झाडे दरवर्षी ‘तेर पॉलिसी सेंटर’ कडून डोंगरांवर लावली जातात. हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. नाव नोंदणीसाठी 9834305125 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा [email protected] या ईमेलवर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जागृती आणि संवर्धनासाठी उपक्रम –

तेर पॉलिसी सेंटर ही संस्था जंगल वाढविणे, विहिरींचे पुनरुज्जीवन करणे, पर्यावरण शिक्षण व पर्यावरण जागृतीसाठी प्रयत्नशील असणारी संस्था. संस्थेने आजपर्यंत पुण्यासह महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक,आसाम, भुवनेश्वर, गोवा, राजस्थान येथे विविध ठिकाणी तीन लाखापेक्षा जास्त वृक्ष लावून त्यांची जोपासना केली आहे.

संस्थेच्या सर्वच उपक्रमांना नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. कॉर्पोरेट कंपन्या मदत करतात. त्यामुळे कामाचा उत्साह वाढतो, असे तेर पॉलिसी सेंटरच्या संस्थापक विनिता आपटे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.