Pune : खाईंस्ट चर्चचे धर्मगुरू रेव्ह. सी. पी. भुजबळ यांचे निधन

एमपीसी न्यूज – पुणे शहरातील प्रसिद्ध खाईस्ट चर्चचे धर्मगुरू रेव्हरेंड डॉ. सी. पी. भुजबळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या मागे दोन मुले, सूना आणि नातवंडे असा परिवार आहे. रेव्ह. ‘भुजचळ यांच्या पार्थिवावर गुक्रवारी ( 3 एप्रिल) दुपारी 12 नंतर अंत्यसंस्कार होणार आहेत.

करेना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी शहरात जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला असल्याने रेव्ह. भुजबळ यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहता ग्रेणार नाही. त्यामुळे अंत्यविधीच्या प्रार्थनेचे थेट प्रसारण एसीटीएस टीव्ही या यू-ट्यूबवर करण्यात येणार असल्याचे चर्च प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रेव्ह. भुजबळ गेली ४२ वर्षे खाईस्ट चर्चचे धर्मगुरू होते. जून १९७९ मध्ये त्यांनी या चर्चच्या धर्मगुरुपदाची सूत्रे घेतली. तब्बल 42 चर्षे एकाच ठिकाणी धर्मगुरू असणारे ते एकमेव होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.