UPDATE Pune : पुण्यात कोरोनामुळे महिलेचा मृत्यू : शहरातील कोरोनाबळींची संख्या दोन

एमपीसी न्यूज : कोरोना व्हायरसची लागण झालेल्या एका महिलेचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित मृतांची संख्या दोनवर पोहचली आहे. दरम्यान, या महिलेला परदेश प्रवासाची पार्श्वभूमी नव्हती तसेच तिला कोणताही आजार नव्हता, अशी माहिती ससून रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.

संबंधित महिला उपचारासाठी १ एप्रिल रोजी ससून रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर होती. प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला ससूनमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी तिला न्युमोनिया असल्याचे निदान झाले होते. तसेच तिच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल गुरूवारी मिळाला. त्यात या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, आज सायंकाळी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिला दुसरा कोणताही आजार नसला तरी उपचाराला उशीर झाल्यामुळे न्युमोनियामुळे तिचा मृत्यू झाला.

मृत महिलेला कुटूंबासह त्याच्या संपर्कातील अन्य व्यक्तींना शोध घेतला जात आहे. शोध लागण्यानंतर त्यांचीही तपासणी केली जाणार असल्याचे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.

पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५१ वर्षीय व्यक्तीचा ३० मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला होता. हा पुण्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरला होता. या व्यक्तीला मधुमेह व अन्य आजारही होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.