Talegaon : ‘स्वामी समर्थ इंडस्ट्रीज’कडून तळेगाव पोलीस स्टेशनला ‘कॉफी मशीन’ भेट

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’सारख्या साथीच्या आजारामुळे देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आले आहे. या संकटात जेव्हा सर्वजण घरात आहेत तेव्हा समाजहितासाठी पोलिस बाहेर पहारा देत आहेत. सामाजिक जाणीवेतून व राष्ट्र प्रथम या उद्देशाने ‘स्वामी समर्थ इंडस्ट्रीज’कडून तळेगाव पोलिस स्टेशनला कॉफी मशीन भेट देण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी स्वामी समर्थ इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा व महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुणेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप नाईक, ‘एमपीसी न्यूज’चे संपादक विवेक इनामदार, स्मिता रानभरे, मावळ तालुका भाजपाचे संतोष दाभाडे, युवा उद्योजक स्वप्नील कुंभार, सामाजिक कार्यकर्ते वैभव कोतुळकर, युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते किरण ओस्वाल, सामाजिक कार्यकर्ते वैभव गुंड, सामाजिक कार्यकर्ते गोपी पिल्ले, तसेच तळेगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शहाजी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य आणीबाणीच्या काळात पोलिस बजावत असलेल्या जबाबदारीबद्दल स्वामी समर्थ इंडस्ट्रीजकडून पोलिसांचे आभार मानण्यात आले.तसेच पिंपरी-चिंचवड व मावळमधील कुठल्याही रुग्णालयांमध्ये डिस्पोजेबल पेपर कप व डिशेस लागल्यास 7057295367 / 9921389459 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1