Pune : ‘ऍम्ब्युलन्स चालक व सहायकांना मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर्स उपलब्ध करून द्या’

शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णांची ने – आण करणाऱ्या ऍम्ब्युलन्स चालक व सहायकांना तातडीने कोविड – 19 चे किट, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर्स उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोरोनामुळे पुणे शहरासह संपूर्ण जगात मोठे संकट निर्माण झाले आहे. पुण्यात 100 पेक्षा जास्त नागरिकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. कोरोना रुग्ण आणि मृत्यू पावलेल्या नागरिकांची ने – आण करण्यासाठी पुणे महापालिकेने जवळपास 500 ऍम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्या आहेत.

मात्र, चालक आणि सहायकांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांना तातडीने कोविड – 19 चे किट, मास्क, ग्लोव्हज, सॅनिटायजर्स, आशा सोयीसुविधा उपलब्ध करून घ्याव्यात, असे पृथ्वीराज सुतार यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतेच आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने हे रुग्ण कमी करण्यासाठी आणखी कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे. त्याचबरोअबर कोरोना विरुद्ध लढा देणाऱ्या योद्धयांचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.