Talegaon : कोरोना लढ्यासाठी आमदार शेळके यांच्यावतीने नगरपरिषदेस वैद्यकीय साहित्य सुपूर्द

एमपीसी न्यूज : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेस आमदार सुनिल शेळके यांच्या ‘आमदार स्थानिक विकास कार्यक्रम’ अंतर्गत कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात अत्यावश्यक असलेल्या पीपीई कीट, एन95 मास्क, थर्मल गन, सॅनिटायझर, ट्रीपल लेअर मास्क, सोडियम हायपरक्लोराइट लिक्विड इ. वैद्यकीय साहित्य मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

मावळचा कुटुंबप्रमुख म्हणून आमदार सुनिल शेळके त्यांची जबाबदारी उत्तम रितीने पार पाडत आहेत, असे गौरवोदगार पनगराध्यक्षा वैशाली दाभाडे यांनी काढले. तसेच कोरोनाच्या संकटसमयी त्यांनी वैद्यकीय सामुग्री व साहित्य दिल्याबद्दल उपनगराध्यक्षा दाभाडे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद व तळेगावच्या नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानले.

यावेळी तळेगाव दाभाडे नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक झिंजाड, आरोग्याधिकारी मयुर मिसाळ, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, नगरसेविका मंगलताई भेगडे, संगिता शेळके, हेमलता खळदे, माजी उपनगराध्यक्ष यादवेंद्र खळदे, माजी नगरसेवक संदीप शेळके, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय काळोखे, माजी शिक्षण मंडळ सभापती दिनेश शहा, ब्रिजेंद्र किल्लावाला, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आशिष खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी शहाराक्षा सुनिता काळोखे, उपाध्यक्षा ज्योती शिंदे, युवती अध्यक्षा निशा पवार, संजय कसाबी, गिरीश चौरे, अनिल धर्माधिकारी, , गोकुळ किरवे, नारायण मालपोटे व इतर पदाधिकारी, सहकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.