Pune :  विभागात 32 हजार 830 क्विंटल अन्नधान्य,  9 हजार 427 क्विंटल भाजीपाल्याची आवक – डॉ. दीपक म्हैसेकर 

एमपीसी न्यूज – सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 32 हजार 830 क्विंटल अन्नधान्याची तर 9 हजार 427  क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे.  विभागात 3 हजार 197 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 4 हजार 8 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

पुणे विभागात 4 मे रोजी 102.466 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 24.000 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

पुणे विभागात 33 हजार 999 स्थलांतरित मजुरांची सोय 1 लाख 5 हजार 799 मजुरांना भोजन पुरवण्यात येत आहे.

सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 159 कॅम्प, कामगार विभागामार्फत 68 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 251 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 478 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत.

या कॅम्पमध्ये 33 हजार 999 स्थलांतरित मजूर असून 1 लाख  5 हजार 799 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.