Pune : पुणे महापालिकेचे करवसुलीचे टार्गेट सेट, वसुलीसाठी 150 कर्मचाऱ्यांची कुमक वाढवली

एमपीसी न्यूज – आर्थिक वर्ष 2023- 24 संपण्यासाठी केवळ पाच महिने शिल्लक (Pune)  आहेत. या कालावधीत कर वसुली चे टार्गेट पूर्ण करण्यासाठी महापालिकेच्या कर संकलन विभागाने कंबर कसली आहे. टार्गेट पूर्ण करण्यासाठी करसंकलन विभागात अतिरिक्त 150 कर्मचाऱ्यांची कुमक वाढवण्यात आली आहे.
नोव्हेंबर ते मार्च या पाच महिन्यात पुणे महापालिकेला (Pune)उद्दिष्टपूर्तीसाठी तब्बल 918 कोटी रुपयांची गरज आहे.
महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 9 हजार 515 कोटी रुपयांचा आहे.

थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेने यापूर्वी अभय योजना राबविली होती. त्यात थकबाकीच्या रकमेवर सूट दिली जाते. मात्र ही योजना राबविल्याने नियमित कर भरणाऱ्यांवर अन्याय करून थकबाकीदारांना सूट दिली जाते, अशी टीका सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने योजना न राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. थकबाकीदारांना प्रत्येक महिन्याला दोन टक्के दंड लावला जात आहे. दंडाची रक्कम वाढू नये, यासाठी त्यांनी कर भरून सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महापालिकेने या वर्षी 15 मे ते 2 ऑगस्ट या कालावधीत मिळकतकरात 5 ते 10 टक्के सवलत दिली होती. त्यात 7 लाख 55 हजार मिळकतधारकांनी 1हजार 283 कोटी रुपये कर जमा केला. त्यानंतर इतर वसुलीमधून केवळ 117 कोटी रुपये जमा झाले.
यंदाचे मिळकतकराचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आणखी 918 कोटी रुपये जमा करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध मार्गांनी थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न सुरू आहेत, त्यासाठी 150 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले आहेत. मिळकती सील करणे, त्यांचा लिलाव करणे, न्यायालयीन प्रकरणे लवकर निकाली काढणे यासाठी हे कर्मचारी कार्यरत असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.