Pune : कोर्टातून जेलमध्ये आलेल्या कैद्याकडे सापडले चरस

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांचे बंदोबस्तावरील गार्ड पुन्हा एकदा (Pune) संशयाच्या भोवर्‍यात सापडले असून मंगळवारी येरवडा जेलमधून कोर्टात नेलेल्या आरोपीला दुपारी परत जेलमध्ये हजर केल्यानंतर त्याच्याकडे 25 ग्रॅम चरस आढळून आले. याबाबत रात्री उशीरापर्यंत येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

शुभम उर्फ बारक्या हरिश्चंद्र पास्ते असे या आरोपीचे नाव आहे. पास्ते हा (Pune) खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून ऑक्टोबर 2017 पासून तो येरवडा जेल येथे शिक्षा भोगत आहे. मंगळवारी पुणे पोलिसांच्या बंदोबस्तात त्याला शिवाजीनगर मोक्का कोर्टात हजर करण्यात आले.

Pune : अखेर ड्रग्ज माफिया ललित पाटील याला चेन्नईतूनअटक

त्यानंतर कोर्टपेशीवरून पोलीस पथकाच्या बंदोबस्तात दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी त्याला परत कारागृहात हजर करण्यात आले. त्यावेळी मुख्य प्रवेशव्दाराजवळच कारागृह शिपायाने त्याची झडती घेतली. त्यावेळी पास्ते याने गुदद्वारामध्ये चरससदृश्य वस्तू लपवून आणल्याचे आढळून आले.

कारागृह पोलिसांनी 25 ग्रॅम चरस जप्त केले. आरोपीवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.

कोर्ट परिसरात दिले चरस?

आरोपी पास्ते याला कारागृहातून तपासणी करून पोलिसांच्या बंदोबस्तात कोर्टात नेण्यात आले. त्याचठिकाणी त्याला कुणीतरी चरस दिल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांच्या बंदोबस्तात असताना त्याला चरस उपलब्ध झाल्याने गार्ड पोलीस पुन्हा संशयाच्या भोवर्‍यात सापडले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.