Pune: श्रावणामुळे मागणी नसल्याने चिकन, मटण, मासळीला दरात घसरण

एमपीसी न्यूज – श्रावणाच्या पार्श्वभूमीवर कमी प्रमाणात माल बाजारात दाखल होत आहे. मागणी घटल्याने मासळीच्या भावात तीस ते चाळीस टक्क्यांनी घसरण झाली आहे. मटण व चिकनला मागणी कमी असल्याने मटणाच्या भावात प्रतिकिलोमागे 60 तर चिकनच्या भावात प्रतिकिलोमागे 20 रुपये तर अंड्यांच्या भावातही दहा टक्क्यांनी घसरण झाली आहे. पुढील काही दिवस हिच परिस्थिती कायम राहिल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

गणेश पेठेतील घाऊक मासळी बाजारात देशाच्या आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल व गुजरात किनारपट्टीवरून मासळी दाखल झाली. अलिबाग आणि रत्निगिरीच्या समुद्र किनार्‍यावरून दहा ते वीस टक्के मालाची आवक झाली.

रविवारी खोल समद्रातील मासळीची 2 ते 3 टन, नदीतील 200 ते 400 किलो तर खाडीतील मासळीची 100 ते 150 किलो आवक झाली. तर आंध्र प्रदेश येथून रहू, कतला, सिलन आदी मासळीची 2 ते 4 टनांची आवक झाल्याचे सांगण्यात आले.

बाजारात मिळणारे भाव पुढीलप्रमाणे : मटण (प्रतिकिलो) : बोकडाचे : 640, बोलाईचे : 640, खिमा : 640 : कलेजी : 680. चिकन (प्रतिकिलो) : चिकन : 180, लेगपीस : 210, बोनलेस : 280, जिवंत कोंबडी : 140. गावरान अंडी : शेकडा : 620, डझन : 84, प्रतिनग 7. इंग्लिश अंडी : शेकडा : 385, डझन : 54, प्रतिनग 4.5

बाजारात सध्या फळांना मागणी आहे. उठाव कमी असल्याने पपई, चिक्कू व इतर सर्व फळांचे भाव स्थिर आहेत. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने पपईच्या भावात किलोमागे 5 रूपयांनी वाढ झाली आहे. रविवारी केरळ येथून अननस 3 ट्रक, मोसंबी 20 टन, संत्री 2 टन, डाळिंब 70 ते 80 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबे दोन ते अडीच हजार गोणी, पेरू 600 क्रेट्स, चिक्कू 1,500 गोणी, कलिंगड 10 ते 15 टेम्पो, सीताफळ 10 ते 15 टन, खरबुजाची 4 ते 5 टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे- लिंबे (प्रतिगोणी) : 50-80, अननस (डझन) : 70-270, मोसंबी : (3 डझन) : 100-450, (4 डझन ) : 30-200, संत्रा : (3 डझन) : 200-400, (४ डझन ) : 100-200, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : 20-80, गणेश : 5-20, आरक्ता 10-30, कलिंगड : 5-10, खरबूज : 20-25, पपई : 5-20, चिक्कू : 100-300, पेरू : 150-400, सीताफळ : 10-70

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.