Pune : कारगिल’च्या लढ्यातील परमवीरचक्र विजेते योगेंद्रसिंह यादव यांना ऐकण्याची पुणेकरांना संधी

एमपीसी न्यूज – कारगिल युद्धात टायगर हिलच्या (Pune)लढाईत दाखवलेल्या शौर्याबद्दल वयाच्या 19 व्या वर्षी देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार परमवीरचक्र मिळालेल्या भारतीय सेनादलातील अधिकारी ग्रेनेडियर योगेंद्रसिंह यादव यांच्या हस्ते ‘व्हायरल माणुसकी’ पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

हा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता लेडी रमाबाई सभागृह, सर परशुरामभाऊ (एसपी) महाविद्यालय, टिळक रस्ता, पुणे येथे होणार आहे. वैभव सुनंदा पंडित वाघ लिखित न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित ‘व्हायरल माणुसकी’ या पुस्तकातून ‘निगेटिव्ह काळातील पॉझिटिव्ह स्टोरी’ शब्दबद्ध करण्यात आलेली आहे.

Maharashtra : गृह विभागात 23 हजार 628 पदांची होणार भरती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
1999 च्या कारगिल युद्धात लढवय्या (Pune)योगेंद्रसिंग यादव यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांना परमवीरचक्र देऊन सन्मानित करण्यात आले. टायगर हिल आणि तोलोलिंगमध्ये प्राण पणाला लावत केलेल्या शौर्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे. लढाऊ व्यक्तीला ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या प्रकाशन सोहळ्यास, योगेंद्रसिंह यादव यांच्या सन्मानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.