Pune : ‘मी अटल’ ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी प्रथम

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा, विद्यार्थी आघाडी यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘मी अटल’ या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी यांने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आशुतोष झा यांने द्वितीय आणि आकाश पाटील यांने तृतीय क्रमांक मिळवला.

या स्पर्धेत सुमारे 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. आयोजकांनी सांगितलेल्या चार विषयांपैकी एका विषयावरील भाषण व्हिडिओच्या माध्यमातून रेकॉर्ड करून व्हॉट्सअपवर पाठवायचे होते. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध वक्ते बाळाभाऊ खांडभोर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेत प्रथमेश रत्नपारखी यांने प्रथम,आशुतोष झा यांने द्वितीय, तर आकाश पाटील यांने तृतीय क्रमांक पटकवला. उत्तेजनार्थ म्हणून केदार भेगडे, भक्ती देशमुख, प्रथमेश चव्हाण, शुभम मोटे आणि प्रमिला धोंगडे यांनी यश मिळवले. प्रथम क्रमांकासाठी 3000, द्वितीय 2000, तृतीय 1000 आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी 500 रूपये असे बक्षीस दिले जाणार आहे. विजेत्यांना डिजिटल प्रमाणात सुद्धा दिले जाणार आहे.

स्पर्धेचे आयोजन भाजपा विद्यार्थी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष संस्कार चव्हाण व सरचिटणीस अनिकेत राक्षे यांनी केले होते. स्पर्धेची दखल घेऊन अध्यक्ष खासदार पुनम महाजन यांच्याकडून आयोजकांचे व उपक्रमाचे कौतुक केले.

या स्पर्धेसाठी माजी राज्यमंञी बाळा भेगडे, गणेश भेगडे, सुदर्शन चौधरी, विशाल घायतडक, सुरज चव्हाण, सचिन लंबाटे, विश्वजित भेगडे यांच्यासह भाजपा विद्यार्थी आघाडी पुणे जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.