Pune : मोहोळ यांच्या उमेदवारीवरून मी एकटाच नाही तर बरेच जण नाराज – संजयनाना काकडे

एमपीसी न्यूज – उमेदवार बदला असे म्हटलेले नाही. मात्र, उमेदीच्या काळात (Pune) कोणी पक्षासाठी काय काय केले हे सांगितले. मी अजूनही  टक्के इच्छुक आहे आणि मोहोळांना उमेदवारी दिल्याने नाराज देखील 100 टक्के आहेच. मी एकटाच नाराज नाही तर बरेच जण नाराज आहेत. जोपर्यंत बी फॉर्म देण्यात येत नाही तोवर मी उमेदवारीसाठी प्रयत्न करत राहील, असे राज्यसभेचे माजी खासदार आणि भाजपचे नेते संजयनाना काकडे यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीसाठी कसब्याच्या पराभवाची मीमांसा करून उमेदवारी द्या, अशी मागणी पुणे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होत असताना वरिष्ठ नेत्यांनी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यापासून पक्षांतर्गत नाराजी आहे, पण पैलवानांची टीम माझ्याकडे आहे. घरोघरी प्रचार करेल असे सांगत विविध प्रिंट मीडियाच्या कार्यालयांना आणि जुन्या नव्या मान्यवर नेत्यांच्या भेटीगाठी घेत मोहोळ यांनी प्रचार सुरु केला आणि या नाराजीकडे सर्रास दुर्लक्ष करत वाटचाल सुरु ठेवली.

Mp Shrirang Barne :  खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर

नाराजी मोठ्या प्रमाणावर वाढतेय हे लक्षात आल्यावर मोहोळ यांनी परवा संध्याकाळी माजी खासदार आणि लोकसभा उमेदवारी स्पर्धेतील इच्छुक संजय काकडे यांची सर्वात शेवटी भेट घेतली. पण नाराजी मात्र येथे संपली नाही. या भेटीचे फोटो केवळ मोहोळ यांनीच (Pune) आपल्या सोशल मिडियातुन प्रसारित केले. काकडे यांनी मात्र तसे काही केले नाही. या नाराजीच्या कायम राहण्याने सूत्रांच्या म्हणण्यानुसार काल संध्याकाळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी काकडे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली तेव्हा काकडे यांनी आपल्या मनातील सारी व्यथा आणि ६ मतदार संघातील परिस्थिती चव्हाण यांच्यापुढे मांडली आणि हे सारे अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पर्यंत पोहोचवा असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.