Pune : रविंद्र धंगेकर पुन्हा आमदार होणार नाहीत; धीरज घाटे यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील (Pune) आमदार रविंद्र धंगेकर हे ‘टेम्पररी’ आहेत. ते खासदार तर सोडाच पुन्हा आमदार होणार नाहीत, अशा शब्दांत पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हल्लाबोल केला. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत घाटे बोलत होते.

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पुणे लोकसभा मतदार संघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होणार असल्याचं दिसत असताना काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करायला सुरुवात केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कसब्यात ज्याप्रमाणे भाजपचा सांगून पराभव केला त्याचप्रमाणे पुणे लोकसभेची जागा सुद्धा काँग्रेस जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Pune : ‘पीएमआरडीए’च्या प्रस्तावाला स्थगिती द्या; माजी नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाना पटोले यांच्या टीकेनंतर पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी  (Pune) काँग्रेसचे कसबा पेठ विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर हे टेम्पररी आमदार असल्याचे म्हटल आहे. कसबा मतदारसंघातील झालेला पराभव पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकून काढणार असल्याचेही घाटे यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.