Pune : ‘ग्रंथालयांचे उदयोन्मुख  परिवर्तन  आणि सक्षमीकरण’ या विषयावरील  राष्ट्रीय कार्यशाळेचे  पुण्यात  आयोजन

एमपीसी न्यूज – डेव्हलपिंग  लायब्ररी  नेटवर्क (डेलनेट), सीओईपी  तंत्रज्ञान विद्यापीठ  व यशस्वी  एज्युकेशन सोसायटीचे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट  ऑफ  मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस ) यांच्या संयुक्त  विद्यमाने ( Pune ) येत्या शनिवारी  दिनांक  6 जानेवारी  2024  रोजी   ग्रंथालयांचे उदयोन्मुख  परिवर्तन  आणि सक्षमीकरण या विषयावरील  राष्ट्रीय कार्यशाळेचे  पुण्यात  आयोजन करण्यात  आले आहे.

Pune : पुणे लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये जुंपण्याची चिन्हे

सीओईपी  तंत्रज्ञान विद्यापीठाच्या  सभागृहात  आयोजित  केल्या जाणाऱ्या  या कार्यशाळेत ग्रंथालयांसाठी  उपयुक्त विविध संगणक  प्रणाली, ऑटोमेशन,शैक्षणिक  क्षेत्रातील  वाङमय चौर्याला  अटकाव कसा  घालावा, तसेच  अद्ययावत  तंत्रज्ञानाच्या आधारे  ग्रंथपालांची कार्यक्षमता  वृद्धी आदी  महत्वपूर्ण  बाबींवर  तज्ज्ञांचे  मार्गदर्शन  उपलब्ध  होणार  आहे. 

डेव्हलपिंग  लायब्ररी  नेटवर्क (डेलनेट) ही  संस्था ग्रंथालय  क्षेत्रातील दक्षिण  आशियातील  एक मोठी  संस्था  असून  विदेशासह  भारतातील  33 राज्ये  व केंद्र  शासित  प्रदेशात कार्यरत आहे. जवळपास  8,300  ग्रंथालयांशी डेलनेट संलग्न  आहे.सुमारे  तीन  कोटी  ऐंशी  लाख  हून अधिक ई- नियतकालिके, ई- पुस्तकांचा  संग्रह वाचकांसाठी उपलब्ध  करून  देण्याचे  काम  डेलनेट  संस्था  प्रभावीपणे  करीत ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.