Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका रुग्णालयातील नोंदणी शुल्क रद्द -महापौर

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या सर्व प्रकारच्या रूग्णालयातील नोंदणी प्रक्रिया आणि शुल्क आकारणी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. याशिवाय या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी सुरु झाल्याचेही महापौरांनी म्हटले आहे.

याबाबत महापौर म्हणाले, ‘कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका रुग्णालयातील केस पेपर अणि शुल्क भरताना रांगेत उभे रहावे लागत होते. यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.

याशिवाय या प्रक्रियेमध्ये आरोग्य विभागाचे मनुष्यबळही जोडले गेले आहे. या मुद्द्याचा विचार करत कोरोनाचे संकट टळेपर्यंत महापालिका रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांवरती नोंदणी शुल्क घेतले जाणार नाहीत’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.