Pune : बहारदार गायन वादनाने रसिक मंत्रमुग्ध

एमपीसी न्यूज – हिंदुस्थानी शास्त्रीय बासरीवादक हिमांशू नंदा यांनी (Pune)त्यांच्या मिस्टिक बांबू फाउंडेशन तर्फे कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर सभागृहात अंतर्ध्वनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात बासरी, तबला आणि गायनाचा सुरेख मिलाफ पहावयास मिळाला.

अंतर्ध्वनी कार्यक्रमात पहिल्या सत्रात हिमांशू नंदा यांनी राग-धानीने बासरी वादनाची सुरुवात केली नंतर राग मारुबिहाग यामध्ये द्रुत लय मधील रचना सादर केली. त्यांना तबल्यावर समर्पक साथ पांडुरंग पवार यांनी, बासरीवर क्षितिज सक्सेना आणि तानपूऱ्या वर दीपांजली सागर यांनी साथसांगत केली.

Pune : ‘महिलांसाठी लष्करातील करीयर संधी’ व्याख्यानास प्रतिसाद

 

दुसऱ्या सत्रात किराणा घराण्याचे पं. जयतीर्थ मेवुंडी यांनी (Pune)आपल्या गायनाची सुरुवात यमन कल्याण रागाने केली नंतर त्यांनी स्वरचित राग भिन्न गंधार सादर केला. त्यांना तबल्यावर पांडुरंग पवार, हार्मोनियमवर मिलिंद कुलकर्णी तर तानपुऱ्यावर करण टिळे आणि नैदिले हेगडे यांनी साथसंगत केली. मेवुंडी यांच्या विसावा विठ्ठल सुखाची सावली.. भजनाने या बहारदार कार्यक्रमाची सुरेल सांगता झाली. माधवी तोडकर यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.