Talegaon : शासन आपल्या दारी योजना फक्त दाखवायलाच आहे का? तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचा नगरपरिषद प्रशासनाला सवाल

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने (Talegaon) दिव्यांग बांधवांना कुठल्याही प्रकारचा मानसिक अथवा शारीरिक त्रास देऊ नये असे आवाहन तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. शासन आपल्या दारी ही योजना फक्त दाखवायलाच आहे का? असा सवाल देखील तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने नगरपरिषद प्रशासनाला विचारला आहे.

तळेगाव शहर काँग्रेस कमिटीने म्हटले आहे की, दिव्यांग बांधवांना संमती पत्राचा अर्ज भरण्यासाठी नगरपरिषदेत बोलवणे म्हणजे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यासारखेच आहे असे प्रतिपादन तळेगाव शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष योगेश पारगे यांनी केले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषदे च्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी संमती पत्र लिहून घेण्यात आले आहे. सदर पत्र लिहून घेण्यासाठी दिव्यांग बांधवांना नगरपरिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठी बंधनकारक केले होते. परंतु, दिव्यांग हे मोठ्या प्रमाणात शरीराने दुर्बल असल्याने सदर ठिकाणी पोहोचू शकत नाहीत त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे.

एकतर अनुदान कमी दिले जात आहे. त्यातच अनुदान खात्यात जमा करण्यासाठी संमती पत्र लिहून घेण्यासाठी नगरपालिकेत जाण्याची सक्ती केल्यामुळे अनेक दिव्यांग बांधव त्रासलेले असून शासन आपल्या दारी ही योजना शासन राबवत असताना दिव्यांग बांधवांना नगरपालिकेमध्ये बोलवणे हा एक चुकीचा निर्णय नगरपालिकेने घेतलेला आहे.

Pune : ‘महिलांसाठी लष्करातील करीयर संधी’ व्याख्यानास प्रतिसाद

दिव्यांग बांधव ज्या ठिकाणी राहत आहेत, त्याच ठिकाणी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना पाठवून त्यांचे संमती पत्र लिहून घेणे (Talegaon) गरजेचे होते. तसेच दिव्यांग बांधव ज्या ठिकाणी राहत आहेत; त्या ठिकाणची रहिवासी पडताळणी देखील करता आली असती परंतु, स्वतःचा त्रास वाचावा यासाठी समाजातील दिव्यांग बांधवांना त्रास देण्याचा घाट नगरपरिषदेने घातलेला आहे तो चुकीचा आहे.

त्यामुळे दिव्यांग बांधवांना त्यांच्या घरी जाऊन संमती पत्र लिहून घ्यावे. त्यामुळे शासन आपल्या दारी ही योजना सार्थ होईल असे प्रतिपादन तळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.