Pune Rural News : ग्रामीण भागात पोलीस ठाणे स्तरावर गुरूवारी तक्रार निवारण दिन

एमपीसी न्यूज – प्रत्येक आठवड्याला पोलीस ठाणे स्तरावर तक्रारदारांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण दिन आयोजित केला जातो. पुणे पोलीस ग्रामीण हद्दीतील नागरिकांसाठी उद्या (गुरूवारी, दि. 30) तक्रार निवारण दिन आयोजित केला आहे. नागरिकांनी तक्रार निराकरण करण्यासाठी सकाळी दहा वाजता संबधित पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोणावळा शहर, हवेली, राजगड, भिगवण, इंदापूर, लोणावळा ग्रामीण, वडगाव मावळ, आळेफाटा, खेड, पौड आणि यवत पोलीस ठाण्यात तक्रादारांनी उपस्थित रहावे असे आवाहन पुणे ग्रामीण पोलिसांनी केले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी स्वत: उपस्थित राहून तक्रार निवारण दिनाचा आढावा घेणार आहेत.

पुणे ग्रामीण हद्दीतील नागरिकांनी संबधित पोलीस ठाण्यात हजर राहून आपली तक्रार निवारण करून घ्यावी असे आवाहन पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.