Chikhali Crime News : लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; मुलगी सहा महिन्यांची गर्भवती

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिश दाखवून एका तरुणाने अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. यामुळे मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार 20 मार्च ते 27 ऑगस्ट या कालावधीत रुपीनगर आणि मोशी येथे घडला.

विठ्ठल मंकाळ पवार (वय 20, रा. ओटास्कीम निगडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने मंगळवारी (दि. 28) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. त्यातून तिला रुपीनगर येथील एका मंदिराच्या पाठीमागे, एका महाविद्यालयात वारंवार भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या दुचाकीवरून पीडित मुलीला मोशी येथील एका लॉजवर नेऊन तिच्यावर वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यामुळे मुलगी गरोदर राहिली. मुलगी सहा महिन्यांची गरोदर असताना हा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.