Pune : संजय काकडे भाजपवर नाराज?; राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची जोरदार चर्चा

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता आणि विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून आणण्यासाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना आता राज्यसभेची उमेदवारी मिळणार नसल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काकडे नाराज असल्याची खमंग चर्चा महापालिकेत सुरू आहे. त्यांना मानणारे महापालिकेत 30 ते 40 नगरसेवक आहेत. त्यांना 3 वर्षांत कोणतेही मनाचे पद मिळाले नाही.

नुकत्याच झालेल्या महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, स्थायी समिती सदस्य निवडीतही काकडे गटाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे हा गट फुटतो की काय? अशी परिस्थिती आहे. महापालिका निवडणुकीला 2 वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. 2017 मध्ये भाजपचे 98 नगरसेवक निवडून येणार असल्याचा अंदाज संजयनाना काकडे यांनी व्यक्त केला होता. नेमके तेवढेच नगरसेवक निवडून आल्याने सर्वच राजकीय पक्षांना धक्का बसला होता.

आगामी महापालिकेची निवडणूक सिंगल वॉर्ड पध्दतीने होणार आहे. त्यामुळे संजयनाना काकडे भाजपचाच राहणार की इतर पक्षात जाणार, याची उत्सुकता आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोथरूडमध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी काकडे यांना वेसण घालणे कठीण असल्याचे वक्तव्य केले होते. कारण एक काकडे आमच्याकडे असल्याचे सांगत संजयनाना काकडे आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांना टोला हाण ण्यात आला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.