Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘सेट’ परीक्षा लांबणीवर

Pune: Savitribai Phule Pune University's 'SET' examination postponed on the backdrop of corona

0

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यासाठी येत्या 28 जून रोजी सहायक प्राध्यापक पदांच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी ‘सेट’ अर्थात राज्य पात्रता परीक्षा पुढे ढकलली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने विद्यापीठाने हा निर्णय जाहीर केला आहे.

विद्यापीठाच्या ‘सेट’ विभागामार्फत यंदा जूनमध्ये सेट परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. यासाठी 1 लाख 11 हजार उमेदवारांनी अर्ज केले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे.

ही परीक्षा मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा या 15 ठिकाणच्या 112 महाविद्यालयांच्या केंद्रांवर घेण्यात येणार होत्या. या परीक्षांचे नवे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा अर्जाची संख्या 9 हजारांनी वाढली आहे. परंतु, करोनामुळे विविध परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने सुध्दा करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती विचारात घेऊन सेट परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परिस्थीतीचा आढावा घेऊन परीक्षेसंदर्भातील माहिती विद्यापीठाच्या वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाईल, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like