Pune : तडीपार गुंड ढम्या जेरबंद; गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या अभिलेखावर असलेला तडीपार गुंड रोहित उर्फ ढम्या शाम सगळगिळे याला गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई आज बुधवारी करण्यात आली.

गुन्हे शाखा युनिट चारच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अब्दूल करीम सय्यद व कर्मचारी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक सुरेंद्र साबळे यांना गुंड ढम्या शाम हा वडगाव शेरी येथे असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे ढम्या शाम सगळगिळे (वय 27, रा. गोपीकृष्ण अपार्टमेंट, मुनरवार हौसिंग सोसायटी, वडगाव शेरी), याला ताब्यात घेण्यात आले.

ढम्या शाम याच्यावर चंदननगर पोलीस ठाण्यात गंभीर दुखापत, मारामारी, तडीपार आदेशाचा भंग, असे गुन्हे दाखल आहेत. त्याला 6 मे 2019 रोजी पुणे शहर व पिंपरी-चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार केले होते. पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी चंदननगर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.