Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांचा सल्ला ठरणार महत्वपूर्ण

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीतून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार बाहेर ( Pune) पडल्यानंतर आता नव्याने पक्ष बांधणीचा कार्यक्रम करणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणूक काँग्रेस लढणार हे निश्चित आहे. त्यासाठी पवार यांचा सल्ला महत्वपूर्ण ठरणार आहे. खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर ही निवडणूक होणार आहे.

PMPML : पीएमपीएमएलकडून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी विशेष बससेवा

भाजपामध्ये माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सुनील देवधर, बापट यांच्या सूनबाई स्वरदा बापट यांची नावे चर्चेत आहेत. तर, काँग्रेसतर्फे आमदार रविंद्र धंगेकर, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी यांच्या नावाची चर्चा आहे. मनसेनेही लोकसभेची जोरदार तयारी सुरू केली आहे. पुणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांनी शहरात जोरदार फ्लेक्सबाजी केली आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा आमदार निवडून आल्याने भाजपाचा पराभव करता येऊ शकतो, असा आशावाद विरोधी पक्षांना वाटत आहे. हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात अजित पवार यांना मानणारे आमदार आहेत. कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत.

यापूर्वी मनसेने दोन वेळा पुण्यात लोकसभा निवडणुकीत नशीब आजमवले. 2009  च्या लोकसभेच्या निवडणुकीत रणजित शिरोळे यांनी 75 हजार 930 मते घेत मनसेची पुण्यात ताकद असल्याचे सिद्ध केले. 2014 च्या निवडणुकीत माजी आमदार दीपक पायगुडे यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी 93 हजार 502  मते मिळविली होती. शिरोळे व पायगुडे हे दोघेही तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे पुण्यात मनसेची ताकद आहे हे सिद्ध झाले आहे. अमित ठाकरे यांच्याकडे पुणे लोकसभेची जबाबदारी असल्याने मनसेने आपली पूर्ण ताकद पुणे लोकसभेसाठी लावली ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.