Rohit Pawar : युवा संघर्ष यात्रेवर पोलिसांचा लाठीचार्ज; रोहित पवार यांचे ठिय्या आंदोलन

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रेवर (Rohit Pawar)  लाठीचार्ज करण्यात आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांची ही यात्रा आज  विधानभवनावर धडकणार होती. परंतु, पोलिसांनी यात्रेवर लाठीचार्ज केला असून राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आज युवा संघर्ष यात्रेचा समारोप नागपूरमध्ये झाला. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी काही मागण्या सरकार समोर ठेवल्या. या मागण्यांचे निवेदन घेण्यास कोणताही नेता आला नाही. जर नेते येणार नसतील तर विधानभवनात जाऊन निवेदन देऊ असे रोहित पवार यांनी जाहीर केले होते.

PMPML : पीएमपीएमएलकडून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी विशेष बससेवा

जाहीर केल्याप्रमाणे रोहित पवार आणि कार्यकर्ते यांनी विधानभवनाकडे कूच केली. यावेळी मात्र त्यांना अडवण्यात आले. युवा संघर्ष यात्रा अडवण्याआधी बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं ते ओलांडूनही कार्यकर्ते आत प्रवेश करत होते. त्यानंतर पोलिसांनी (Rohit Pawar ) कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी लाठीचार्ज केल्यावर कार्यकर्तेही आक्रमक झाले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. यासाठी रोहित पवार आणि त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.