PMPML : पीएमपीएमएलकडून सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवासाठी विशेष बससेवा

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये 69 वा सवाई गंधर्व भीमसेन( PMPML ) महोत्सव 2023 महाराष्ट्रीय मंडळ क्रिडा संकुल, मुकुंदनगर, पुणे येथे 13 ते 17 ड़िसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सव करता परिवहन महामंडळाकडून दरवर्षी प्रमाणे विशेष बससेवा पुरविण्यात येत आहे.

Talawade : वाहतूक कोंडीचे केंद्र बनतोय तळवडे परिसर

सदरच्या कार्यक्रमास पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांच्या विविध भागांतून असंख्य रसिक श्रोतावर्ग उपस्थिती दर्शवत आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या रसिक श्रोत्यांसाठी कार्यक्रम संपल्यानंतर परतीच्या सोयीसाठी परिवहन महामंडळाकडून 25 टक्के जादा दराने बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीएमएल कडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या बसेसचा तपशील खालीलप्रमाणे-

दि. 13 ते 15 व 17 डिसेंबर रोजी बस सेवा – यावेळी 25 टक्के ज्यादा दराने तिकीट आकारण्यात येणार आहे.

1) मुकुंदनगर ते निगडी – भक्ती शक्ती – (मार्ग क्र. 42 ने) –  दांडेकर पूल, डेक्कन,वाकडेवाडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड स्टेशन – वेळ – रात्री साडे दहा वाजता दर 40 रुपये

2)  मुकुंदनगर ते धायरी मारूती मंदिर (मार्ग क्र. 117 ने) -दांडेकर पूल, विठ्ठलवाडी,  आनंदनगर, वडगांव फाटा,धायरी गांव -रात्री साडे दहा व साडे बारा वाजता  25 रुपये

3) मुकुंदनगर ते कोथरूड डेपो –  (मार्ग क्र. 103 ने) टिळक रोड, डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, जयभवानीनगर, वनाज कंपनी रात्री साडे दहा वाजता व रात्री साडेबारा पर्यंत दर 20

4) मुकुंदनगर ते वारजे माळवाडी (मार्ग क्र. 72 ने) डेक्कन कॉर्नर, पौड फाटा, कोथरूड स्टॅण्ड, गांधी भवन, कर्वेनगर रात्री साडे दहा वाजता ते साडे बारा दर 25 रुपये.

तरी सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या रसिक श्रोत्यांना पीएमपीएमएलच्या बससेवेचा लाभ जास्तीत जास्त प्रमाणात घ्यावा, असे आवाहन पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून करण्यात आले ( PMPML ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.