Talawade : डंपर आणि दुचाकीचा अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार

एमपीसी न्यूज – त्रिवेणीनगर – तळवडे रस्त्यावर डंपर आणि दुचाकीचा अपघात ( Talawade) झाला. डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार डंपरच्या चाकाखाली आला. त्यात चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 12) सायंकाळी पावणे पाच वाजता घडला.

नवनाथ भानूदास गायकवाड (वय 40, रा. सोनवणे वस्ती, ताथवडे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Pune : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार यांचा सल्ला ठरणार महत्वपूर्ण

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ गायकवाड हे त्यांचा मुलगा दीपक याच्यासोबत दुचाकी (एमएच 14/जीबी 5611) त्रिवेणीनगर येथून तळवडेच्या दिशेने जात होते. गणेशनगर चौकाजवळ आल्यानंतर गायकवाड यांच्या दुचाकीला डंपरने (एमएच 14/एचयु 9279) पाठीमागून धडक दिली.

डंपरच्या धडकेत दुचाकी डंपरच्या चाकाखाली आली. त्यात नवनाथ गायकवाड हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा दीपक हा या घटनेत गंभीर जखमी झाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर बाबर, सुनील टोणपे आणि ज्ञानेश्वर काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात डंपर चालकाच्या हलगर्जीपणामुळे झाला असून त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु ( Talawade)  आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.